Home संगमनेर संगमनेर: मुलीला मरणाच्या दारातून काढताना वडिलांचा मृत्यू

संगमनेर: मुलीला मरणाच्या दारातून काढताना वडिलांचा मृत्यू

संगमनेर: विजेचा धक्का बसत असलेल्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे घडली.

गुरुवारी सायंकाळी दिनांक ११ सायंकाळी संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे ही घटना घडली. या घटनेत मुलगी वाचली पण यात वडिलांचा मृत्यू झाला. अशोक अद्रेस सोनवणे वय ३८ असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

शेडगाव परिसरात गुरुवारी सायंकाळी रिमझिम पाउस चालू होता. अशोक सोनवणे यांची मुलगी घराशेजारी असलेल्या गोठयालागत उभी असताना मोठ्याने ओरडली त्यामुळे सोनावणे हे बाहेर गेले व मुलीला शॉक बसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जीवाच्या आकांताने मुलीला बाजूला लोटले मात्र ते पाय घसरून पडले व गोठ्यातील खांबाला त्यांचा स्पर्श झाला. या खांबाला विजेचा प्रवाह उतरला होता. त्यामुळे विजेचा धक्का बसून कोसळले. सोनवणे यांना उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मागे मोठा परिवार आहे तसेच त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.   

Website Title: Latest News Sangamner death of the father while being taken

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here