Home Uncategorized वीरगाव येथील घटना: बेडकाचा पाठलाग करीत असताना नाग घुसला घरात

वीरगाव येथील घटना: बेडकाचा पाठलाग करीत असताना नाग घुसला घरात

अकोले: पावसाळा सुरु झाला की बेडकांची संख्या वाढते मग या बेडकांची शिकार करण्यासाठी सापही बेडकाचा पाठलाग करीत मानवी वस्तीत घुसल्याचे प्रसंग घडतात.

असाच प्रकार अकोले तालुक्यातील वीरगाव येथे गुरुवारी रात्री घडला. वीरगाव येथील वस्तीवर अणासाहेब वाकचौरे यांच्या घरात रात्री साडे नऊ वाजता त्यांच्या घरात बेडकाचा पाठलाग करीत घरात घुसला आणि  साप कपाटामागे लपला.

बेडूक, उंदराच्या शिकारीसाठी अनेकदा धामीन साप घरात येत असतात पण गुरुवारी रात्री घरात आलेला सात आठ फुटाचा नाग असल्याचा निदर्शनास आले. त्यांनी नागाचे फोटो काढले. मोबाईलने कपाटाच्या फटीतून फोटो काढीत असताना साप कोपरयात सरकला आणि आणखी एक जवळून फोटो काढला तर त्याने फणा वर काढून नाग असल्याची ओळख करून दिली.

वाकचौरे यांनी घराचे दार व खिडक्या उघड्या करून त्याला रस्ते मोकळे करून दिले. थोड्याच वेळात संधी साधून हा नाग निसर्गात लुप्त झाला. नागाला पाहून मात्र त्याची त्रेधतीरपिट उडाली होती. 

Website Title: News chasing the frog, the snake entered the house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here