Home संगमनेर संगमनेर शहरात आणखी दोन पॉझिटिव्ह, त्यातील एक मृत्यूमुखी

संगमनेर शहरात आणखी दोन पॉझिटिव्ह, त्यातील एक मृत्यूमुखी

संगमनेर: संगमनेर शहरात मालदाड रोड व लखमीपुरा येथे दोन करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यातील मालदाड रोड येथील ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

संगमनेर तालुक्यात नऊ जणांचा बळी करोनाने घेतला आहे तर करोनाबाधितांची संख्या ८३ वर पोहोचली आहे.

संगमनेर शहरातील मालदाड रोड येथील ७२ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ती एका खासगी रुग्णालयात दाखल होऊन तिच्या घशाचे स्त्रावचे खासगी तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रशासनांनी असा दावा केला की, तिचा मृत्यू हा करोनाने नाहीतर हृद्यविकाराच्या झटक्याने झाला आहे.मात्र याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.

संगमनेर शहरातील लखमीपुरा भागातील एक २२ वर्षीय व्यावसायिक तरुणास करोनाची लागण झाली. त्याचा खासगी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता या दोघांना कोणामुळे आणि कशी बाधा झाली याबाबत प्रशासन माहिती घेत आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधित ८३ झाले आहेत.

Website Title: Coronavirus Sangamner two positive death one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here