Home Ahmednagar Live News Bribe: लाच मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

Bribe: लाच मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा

Ahmednagar Bribe Case: २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल.

Crime against police officer for asking for bribe

शेवगाव:  अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याविरोधात मंगळवारी (दि. ३१) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस नाईक एस. सी. काकडे असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शेवगाव येथील २४ वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते.

अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी काकडे याने फिर्यादीकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच १४ ज लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने अधिक पडताळणी करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास, नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधकच्या पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Web Title: Crime against police officer for asking for bribe

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here