Home अहमदनगर महिलेस शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकावर गुन्हा

महिलेस शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकावर गुन्हा

Crime News Accused of abusing a woman and threatening to kill 

श्रीगोंदे | Crime News | Shrigonde: तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथील एका महिलेने बजाज फायनान्सच्या शाखेतून १ लाख ६१ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील दोन हप्ते थकल्याने वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याने महिलेला व तिच्या मुलाला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजाज फायनान्सचा वसुली कर्मचारी लुकमान मुजावर व त्याचा जोडीदार हे टाकळीकडेवळीत सुपेकर यांच्या घरी वसुलीसाठी गेले असता शिवीगाळ केली व त्यांचा मुलाला भेटेल तिथे मारू अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शिंदे हे करीत आहे.

Web Title: Crime News Accused of abusing a woman and threatening to kill 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here