Home अहमदनगर धक्कादायक: अहमदनगर जिल्ह्यात याठिकाणी चालते करणी-भानामती, जादूटोणा

धक्कादायक: अहमदनगर जिल्ह्यात याठिकाणी चालते करणी-भानामती, जादूटोणा

Karni-Bhanamati, sorcery is practiced here in Ahmednagar 

राशीन | Ahmednagar | Karjat: काळी बाहुली, गळ्यातील ताईत, पंचरंगी दोरा, टाचण्या, बिब्बा, काळे राळे, उडीद, दातवण, भोजपत्र, सुया, दाभण, चमड्याची चप्पल, घोड्याच्या पायाचे नाल, चांभारी खिळे, प्लॅस्टिकचे लिंबू-मिरची, विविध जातींचे ऊद आदी साहित्याला राशीनमध्ये रोज मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एका दुकानातून महिन्याला किमान चाळीस हजारांची उलाढाल या वस्तूंच्या विक्रीतून होत आहे. जादूटोणा आणि गंडादोऱ्याचे साहित्य विकणाऱ्या केवळ तीन दुकानांतील उलाढाल सव्वा लाखाच्या आसपास आहे. यामध्ये देवऋषी म्हणणाऱ्या भोंदूबाबांची दक्षिणा किमान पाचशे ते हजार रुपयांच्या घरात आहे. समोरच्याचा अंदाज घेऊन ही दक्षिणा काही हजारांच्या घरात मागितली जाते. अनेक दिवसांपासून हा उद्योग राशीन येथे सुरु आहे.

जादूटोण्याच्या या साहित्यामध्ये महिन्याला २१० डझन काळ्या बाहुल्या, सहा हजार ताईत, पंधरा किलो पंचरंगी दोरा, तीन हजारांच्या टाचण्या, २५ एमएमची ६० डझन छोटी कुलपे, १५ किलो बिब्बा, १५ किलो काळे राळे व उडीद, तीन हजार भोजपत्रे, तीन हजारांच्या सुया-दाभण, चमड्याच्या बारीक तीन हजार चपला आणि काही हजारांत विकला जाणारा महागडा ऊद या साहित्याचा समावेश आहे.

भानामती, करणी करणे, भूतबाधा दूर करणे, उतारा करणे, गायीचे दूध उडविणे यांसह विविध गोष्टींसाठी देवऋषांकडून वरील वस्तूंना मोठी मागणी असते. ईर्ष्या, दुश्मनी, स्पर्धा, अनारोग्य, चैनीच्या गोष्टींसाठी, तसेच विकृती आणि अज्ञान, दारिद्र्यामुळे माणसे आजही अंधश्रद्धेच्या विळख्यात पूर्णत: अडकली आहेत. या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जाते.

अंधश्रद्धेबाबत २०१३ मध्ये कायदा करण्यात आला असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने केवळ भोंदू, बुवाबाजी करणारेच यात दोषी नाहीत, तर त्यांच्याकडे जाणारा समाजघटकही दोषी आहे.

– रंजना गवांदे, राज्य सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Web Title: Karni-Bhanamati, sorcery is practiced here in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here