Home अहमदनगर मुलाला अटक करण्यासाठी पोलीस येताच आईचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

मुलाला अटक करण्यासाठी पोलीस येताच आईचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू

Theft Case Mother dies of heart attack as police arrive to arrest child

श्रीरामपूर |Theft| Shrirampur: श्रीरामपूर तालुका हद्दीतील चोरी प्रकरणातील माल वाहतूक केल्याच्या आरोपातील संशयित ट्रक चालकास ताब्यात घेण्यासाठी पहाटे पोलीस घरी आले असता याचा धक्का सहन न झाल्याने वृद्ध मातेला हृदयविकाराचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  नातेवाईकांनी शवविच्छेदनास विरोध केल्याने मोठ्या पोलिस बंदोबस्तात व तणावपूर्ण वातावरणात या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. विठाबाई काकडे असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीरामपूर  तालुका पोलीस ठाणे हद्दीत एक बंधार्‍याच्या प्लेट चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे, . या प्रकरणाचा तपास सुरु असून या प्रकरणातील तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात आरोपीने एका मालट्रकमधून या मालाची वाहतूक केल्याचे समोर आले. त्यामुळे या ट्रक चालकास ताब्यात घेण्यासाठी काल गुरुवारी पहाटे पोलीस पथक शहरालगतच्या गायकवाड वस्ती येथील ट्रक चालकाच्या घरी गेले. या ट्रक चालकाची 62 वर्षीय आई आली. आपल्या मुलाकडे पोलीस आल्याचा धक्का तिला सहन झाला नाही. पोलिसांसमोरच त्या जागेवरच कोसळल्या. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने या महिलेला तात्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच हृदयविकाराने या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी न करता घरी आणला. पोलिसही निघून गेले.

मात्र वरिष्ठांच्या सुचनेवरून पोलिसांनी पुढील काही समस्या उद्भवू नये व पोलिसांवर आरोप होऊ नये म्हणून शवविच्छेदन करून घेण्याचा आग्रह धरला. मात्र नातेवाईकांनी त्यास विरोध केला. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप व तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर नातेवाईक संतप्त झाले. नातेवाईक व पोलिसात चांगलीच शाब्दीक चकमक झाली. त्यावर पोलिसांनी पोलिसांनी अधिक कुमक मागवून शेवटी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी श्रीरामपूरच्या स्मशानभूमीत नेला. उत्तरीय तपासणी नंतर त्यांचेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. 

Web Title: Theft Case Mother dies of heart attack as police arrive to arrest child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here