Home अहमदनगर कारागृहामधून आरोपीं पलायनप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांसह सहाजण निलंबित

कारागृहामधून आरोपीं पलायनप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांसह सहाजण निलंबित

Ahmednagar Rahuri Six persons, including a police sub-inspector, have been suspended in connection

राहुरी | Ahmednagar: राहुरीच्या कारागृहामधून गज तोडून पाच आरोपींनी पलायन केल्याची घटना घडली होती. देशाचे गृहमंत्री जिल्ह्याच्या दौर्‍यावर येण्यापूर्वीच आरोपींनी कारागृहातून पलायन केल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. या घटनेने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांवर कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हवालदार संजय राठोड, पोलीस नाईक संजयकुमार जाधव, रोहिदास गुंडाके, पोलीस शिपाई बाळू चाबुकस्वार, व महिला पोलीस शिपाई मनिषा गुंड अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.

शनिवारी पहाटे राहुरी कारागृहाच्या खिडकीचे गज कापून मोक्का गुन्ह्यातील आरोपी सागर भांडसह पाच जणांनी पलायन केले होते. यातील तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. तर अन्य दोघे अद्यापही पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Web Title: Ahmednagar Rahuri Six persons, including a police sub-inspector, have been suspended in connection

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here