Home अहमदनगर Accident: एक अपघात करुन आलेल्या कारने शाळकरी मुलाला उडविले, गंभीर जखमी

Accident: एक अपघात करुन आलेल्या कारने शाळकरी मुलाला उडविले, गंभीर जखमी

Accident schoolboy was blown away by an accidental car

राहता |Accident| Rahata:  राहाता तालुक्यातील साकुरी या गावात अपघात झालेल्या स्विफ्ट कारने आणखी एक अपघात करत मुलास गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. नांदुर्खी येथे एका शाळकरी मुलाला जोराची धडक दिल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

साकुरी येथील संस्थान कर्मचारी रोहोम यांचा  हा एकुलता एक मुलगा या अपघातात जखमी झाला आहे.  या कारने जोराची धडक देऊन सदर चालक नांदूर्खी चौकात ही दोन मोटारसायकलस्वारांना कट मारीत होता. तो शिर्डीच्या दिशेने पुन्हा सुसाट वेगाने गाडी वाकडी तिकडी चालवत असतानाच राजेंद्र दाभाडे यांच्या रोड लगत असलेल्या वस्तीवरही तो येऊन धडकला. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

प्रथमदर्शी पाहणार्‍या नागरिकांनी सांगितले की सदर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा प्रकार झाला आहे. सदर घटनेची माहिती काही नागरिकांनी शिर्डी पोलिसांना दिली. वाहकाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकाला अपघाताला सामोरे जावे लागले आहे. अशा सुसाट वाहन चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Accident schoolboy was blown away by an accidental car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here