Home क्राईम Crime News: संगमनेरात तरुणीस धमकी व विनयभंग

Crime News: संगमनेरात तरुणीस धमकी व विनयभंग

 

Crime news Harassment and threats of a young woman in Sangamner

संगमनेर | Crime News: अ‍ॅट्रॉसिटीचा दाखल करू अशी धमकी देत तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शहरातील मालदाड रोड परिसरात काल सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन  जणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मालदाड रोड परिसरात राहणार्‍या एका कुटुंबियांसोबत राजू यादव खरात रा. घुलेवाडी व धीरज सोमनाथ ढगे रा. संगमनेर यांचा जमिनीवरून वाद आहे. काल सकाळी राजू यादव खरात व धीरज ढगे हे या कुटुंबियांच्या घरात गेले. यावेळी 25 वर्षाची तरुणी घरात एकटीच ऑनलाईन अभ्यास करत होती. मी दलित पँथरचा अध्यक्ष आहे. आम्ही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, तुम्ही आमचे काही करू शकत नाही असे म्हणून राजू खरात याने सदर तरुणीचा हात धरुन तिला ओढले. यावेळी त्याने तिच्याशी अश्लिल वर्तन केले. तर धीरज ढगे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हंटले आहे.

याप्रकरणी सदर तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राजू यादव खरात व धीरज सोमनाथ ढगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास फटांगरे हे करीत आहे.

Web Title: Crime news Harassment and threats of a young woman in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here