Home अहमदनगर दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्याला चाकू लावत साडे तीन लाखांची चोरी

दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्याला चाकू लावत साडे तीन लाखांची चोरी

Ahmednagar News today Theft of Rs 3.5 lakh by stabbing a woman

राहाता | Ahmednagar News Today: राहता तालुक्यातील अस्तगाव येथे मुख्य गल्लीत भरदिवसा एका घरातील महिलेच्या गळ्याला चाकू लावत घरातील रोख रक्कम व सोने चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. मोहसीन महम्मद शेख यांच्या घरात ही चोरीची घटना घडली आहे.

मोहसीन महम्मद शेख यांच्या पत्नी ह्या घरात एकट्याच होत्या. दोघा चोरट्यानी घरात प्रवेश करून किचनमध्ये असलेल्या त्यांच्या पत्नीला मोहसीन कुठे गेले असे विचारले. त्यावर तिने ते नमाजला गेले असे सांगितले.

दोघांपैकी एकाने तिचा गळ्याला चाकू लावला व तिच्या अंगावरील संपूर्ण दीड तोळेचे दागिने ओरबाडून घेतले. तसेच वरच्या मजल्यावर चाकू लावून नेले, जिन्यावर तिला चाकू लावून उभे केले. तो पर्यंत एकाने वरील दोन्ही खोल्या मधील कपाटाची उचकापाचक करत दीड लाखाची रक्कम व साडेतीन तोळे सोने असे एकूण साडेतीन लाखाचा ऐवज चोरून नेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तपास सुरु केला आहे.

Web Ttile: Ahmednagar News today Theft of Rs 3.5 lakh by stabbing a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here