Home क्राईम संगमनेरात दोघांना शिवीगाळ करून धक्काबुक्की

संगमनेरात दोघांना शिवीगाळ करून धक्काबुक्की

Sangamner Crime News both of them were insulted and pushed

संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील मालदाड रोड येथे वाद असलेल्या जागेच्या सरकारी मोजणीसाठी थांबलेल्या बहिण भावाला तिघांनी जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी उशिरा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दशरथ बबन सातपुते, योगेश दशरथ सातपुते, शीतल दशरथ सातपुते सर्व रा. मालदाड रोड संगमनेर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

याप्रकरणी जया राहुल डोळस रा. चैतन्यपूर संगमनेर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास मालदाड रस्ता येथील जागेच्या सर्वे नंबर २२६ सरकारी मोजणीसाठी जया डोळस आणि त्यांचे भाऊ राजू खरात हे दोघे बहिण भाऊ थांबले असता त्यावेळी दशरथ बबन सातपुते, योगेश दशरथ सातपुते, शीतल दशरथ सातपुते यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. हा सर्व प्रकार त्यांनी पोलिसांनी सांगितला. डोळस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमनेर उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Sangamner Crime News both of them were insulted and pushed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here