Home संगमनेर संगमनेर शहरातील डॉ. निघुते यांची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर शहरातील डॉ. निघुते यांची गळफास घेऊन आत्महत्या

Sangamner Doctor poonam Nighute Suicide

संगमनेर |  Suicide: संगमनेर शहरातील नवीन नगर रोडवरील चिरायू हॉस्पिटल मधील डॉ. पुनम योगेश निघुते (वय 35)  यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ताजणे मळा परिसरात घडली. शहरातील ताजणे मळा परिसरात डॉक्टर पुनम निघुते राहत होत्या.

पती-पत्नी दोघेही डॉक्टर  असून ते नवीन नगर रोड येथे चिरायू नावाचे चालवतात. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास डॉ. पुनम यांनी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

याप्रकरणी दत्तात्रय गुलाबराव जोंधळे यांनी शहर पोलिसांठाण्यात खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार श्री. शेख करत आहे. डॉ. पुनम निघुते यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Sangamner Doctor poonam Nighute Suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here