Home अहमदनगर Crime News: प्रेमासाठी केला नोकरीचा बनाव, प्रियकरास अटक

Crime News: प्रेमासाठी केला नोकरीचा बनाव, प्रियकरास अटक

Crime News Make a job done for love

अहमदनगर | Crime News: एका मुलीसोबत प्रेम जुळले, मुलीने सरकारी नोकरी लागली तर लग्न करेन अशी अट घातल्याने लग्नाचा चंग बांधण्यासाठी लष्कराचा गणवेश खरेदी करत प्रेयसीला लग्नासाठी तयार करण्यासाठी लष्करात नोकरीस असल्याचा बनाव केल्याप्रकरणी लोणी येथील एका युवकाला लष्करी अधिकाऱ्यांनी पकडून भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रविवारी ही घटना समोर आली. त्याच्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एका खासगी संस्थेत काम करत असताना एका मुलीबरोबर प्रेमाचे सुत जुळले. तुला सरकारी नोकरी लागली तरच मी तुझ्या बरोबर लग्न करेल, नाही तर हे प्रेम प्रकरण इथेच थांबेल असे प्रेयसीने त्याला बजावले होते. मात्र, तिच्याशीच लग्न करण्याचा चंग याने बांधला. त्यामुळे त्याच्या मनात भन्नाट कल्पना आली. त्याने लष्कराचा गणवेश खरेदी केला. त्यावर मेजर असे नाव टाकले.

त्या गणवेशातील फोटो प्रेयसीला पाठविला. मात्र, त्यावर समाधानी न होता तिने तू ज्या ठिकाणी लष्करामध्ये नोकरी करतो त्या ठिकाणचे मला फोटो पाठव, तसेच तुझा लष्करी सराव कशा पद्धतीने होतो व तेथे तू काय काम करतो हे मला लाईव्ह दाखव, तरच मला तुझी खात्री पटेल’ असे सुनावले.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज 

काल दुपारच्या सुमारास गणवेश घालून लष्करी हद्दीमध्ये गेला होता. तेथे फिरत असताना संशय आल्याने लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा मी एमआयआरसीमध्ये नोकरीस असल्याचे त्याने सांगितले. त्याने दाखविलेले ओळखपत्र बनावट असल्याचे लष्कराच्या लक्षात आहे. तसेच नोकरी मिळवण्यासाठीची काही बनावट कागदपत्रेही जगतापने तयार केली असल्याचे आढळल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime News Make a job done for love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here