Home अहमदनगर संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयातील दप्तर जाळले

संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयातील दप्तर जाळले

Rahuri office bag of Sangamner Cooperative Sugar Factory was burnt

राहुरी | Rahuri: एफआरपी जाहीर न केल्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या राहुरी फॅक्टरी येथील कार्यालयाला टाळे ठोकून कार्यालयातील दप्तर जाळण्यात आले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

नगर जिल्ह्यातील एकही कारखाना एफआरपी जाहीर करत नसल्याने नगर जिल्ह्याचे जबाबदार नेते महसूलमंत्री थोरात यांच्या संगमनेर कारखान्याच्या राहुरी फॅक्टरी येथील कार्यालयाला टाळे ठोकून कार्यालयातील दप्तर जाळण्यात आले. उसाचा भाव जाहीर करण्यात कोणोही पुढाकार घेत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलनाचे पाउल उचलावे लागले असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज 

अगोदर भाव जाहीर करा तरच कारखाना सुरु करा असे आवाहनही मोरे यांनी केले आहे. जिल्ह्यातील कारखाने उत्पादकांना एक हजार रुपयांपर्यंत भाव कमी देत असल्याने हे आंदोलन हाती घेतले आहे.

Web Title: Rahuri office bag of Sangamner Cooperative Sugar Factory was burnt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here