Home Accident News Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Accident Young man killed in unidentified vehicle crash

नेवासा |Accident | Nevasa: नेवासा फाटा येथे अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या तरुणास धडक दिल्याने मृत्य झाल्याची घटना घडली आहे.  याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित सुनील इंगळे (वय 25) असे धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी उत्तम दिनकर इंगळे (वय 55) रा. नविन काळेगाव मुकिंदपूर शिवार ता. नेवासा यांनी फिर्याद दिली आहे.

नेवासा फाटा येथे नगर-औरंगाबाद रोडने त्यांचा चुलत नातू सुमित सुनील इंगळे (वय 25) हा 24 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पायी चालला असताना नगरहून औरंगाबादच्या दिशेने चाललेल्या अज्ञात आरोपीने त्याच्या ताब्यातील अज्ञात वाहन औरंगाबादच्या दिशेने अविचाराने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष  करून पायी चालणार्‍या सुमित इंगळे यांस धडक देऊन अपघात केल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Accident Young man killed in unidentified vehicle crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here