Home Ahmednagar Live News अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा

Crime News Molestation of a minor girl

अहमदनगर |Crime News| Ahmednagar: अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आरोपी सचिन तुळशीराम शिकारे (वय 28 रा. धनगरवाडी ता. नगर) याला विनयभंग, पोक्सो कलमान्वये दोषी धरून न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

तसेच याच गुन्ह्यातील आरोपी विकास तुळशीराम शिकारे, सुभद्रा तुळशीराम शिकारे (दोघे रा. धनगरवाडी) यांना भादंवि 323 प्रमाणे दोषी धरून प्रत्येकी एक हजार रुपये दंड, सुभद्रा शिकारे हिला भादंवि कलम 504 प्रमाणे दोषी धरून पाचशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

29 ऑगस्ट 2018 रोजी अल्पवयीन मुलगी कॉलेजला जाण्यासाठी बस स्थानकावर उभी असताना सचिन शिकारे याने तिचा हात धरून छेड काढण्यात आली होती.

मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर सचिनच्या घरी ते गेले. तेथे असलेल्या विकास व सुभद्रा शिकारे यांनी मुलीसह तिच्या आई-वडिलांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याप्रकरणी पीडित मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. आर. गोरे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मनीषा पी. केळगंद्रे- शिंदे यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे, सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी धरून शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: Crime News Molestation of a minor girl

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दररोजच्या नवीन अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा: संगमनेर अकोले न्यूज- अहमदनगर लाईव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here