Home अहमदनगर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर गुन्हा दाखल

Crime News against former MLA Balasaheb Murkute

नेवासा | Crime News: वीज वितरण कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस नाईक प्रताप दहीफळे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, दि.२३ रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस निरीक्ष्गाक बाजीराव पोवार, पोलीस उपनिरीक्षक संधान भाटेवाल व आम्ही कर्मचारी वीज वितरण कार्यालयात सुरु असलेल्या आंदोलनस्थळी गेलो असता भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे तसेच २० ते २५ कार्यकर्ते शेतीपंपाची वीज कट करू नये यासाठी आंदोलन करीत होते. त्यांनी आंदोलनाचे निवेदन पोलीस ठाण्यास कळविले नव्हते. कार्यकर्ते व अधिकारी यांच्यात चर्चा सुरु होती. चर्चेत मार्ग निघत नसल्याचे पाहून अचानक माजी आमदार बाळसाहेब मुरकुटे यांनी कार्यालयाच्या छताला दोरी बांधून फास गळ्यात घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यातील फास काढून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी मध्यस्थी करून पिण्यासाठी एक तास वीज सुरु ठेवण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Crime News against former MLA Balasaheb Murkute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here