आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशिभविष्य: श्री विनायक जोशी जोर्वे . आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ वार: शुक्रवार
मेष राशी भविष्य
प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो, त्यामुळे काळजी घ्या. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्य-क्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात अश्यात माता-पिताला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे कारण, दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. लकी क्रमांक: 4
वृषभ राशी भविष्य
आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. उद्यामशील लोकांसोबत भागीदारी कराल. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात. तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे. लकी क्रमांक: 4
मिथुन राशी भविष्य
तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल. लकी क्रमांक: 2
कर्क राशी भविष्य
निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कुटुंबिय अथवा मित्रांबरोबरील स्नेहमेळाव्यामुळे आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. लकी क्रमांक: 5
सिंह राशी भविष्य
प्रकृतीची काळजी घ्या आणि सर्व गोष्टी व्यवस्थित करा. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता. आज कुणाला माहिती नसतांना आज तुमच्या घरात कुणी दूरच्या नातेवाइकांचे आगमन होऊ शकते ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल. लकी क्रमांक: 3
कन्या राशी भविष्य
बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आज ही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल परंतु, कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल. लकी क्रमांक: 2
तुळ राशी भविष्य
आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा, ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आज कुणाला माहिती नसतांना आज तुमच्या घरात कुणी दूरच्या नातेवाइकांचे आगमन होऊ शकते ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. लकी क्रमांक: 4
वृश्चिक राशी भविष्य
आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुस-यांच्या दडपणाखाली वावरू नका. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. लकी क्रमांक: 6
धनु राशी भविष्य
मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर प्रेमाची नर्म उबदार अनुभूती शेअर करणे प्रेम. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. लकी क्रमांक: 3
मकर राशी भविष्य
तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील – परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या – आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी कामाचा ताण घेऊन दमून जाण्याची गरज नाही. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. लकी क्रमांक: 3
कुंभ राशी भविष्य
तुमच्या वाईट सवयीमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग ओढवू शकतो. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. आज कुठल्या सहकर्मी सोबत तुम्ही संद्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकतात तथापि, शेवटी तुम्हाला शेवटी वाटेल की, तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज तोडी मोकळीक हवी असेल. लकी क्रमांक: 1
मीन राशी भविष्य
आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका, त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्ना करा. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पनादेखील मांडा. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. लकी क्रमांक: 7
Web Title: Rashi Bhavishya Today in Marathi 26 November 2021