Home अहमदनगर जुगार अड्ड्यावर छापा: दोघे ताब्यात, दोघे फरार  

जुगार अड्ड्यावर छापा: दोघे ताब्यात, दोघे फरार  

Ahmednagar Crime News a gambling den

अहमदनगर | Crime News | Ahmednagar: शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे तर दोन जण पसार झाले आहेत.  

बोधेगावमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसा पोलीस अंमलदार संतोष लोढे, शंकर चौधरी, आकाश काळे यांना कारवाईचे आदेश दिल्याने पथकाने बोधेगावात छापा टाकत कारवाई केली.

बबन बाळासाहेब ढेसले (वय 38), जिगरा सुरेश आंगरख (वय 20 दोघे रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे.

नारायण सखाराम भोंगळे, भगवान मिसाळ (दोघे रा. बोधेगाव) असे फरार झालेल्यांची नावे आहेत. आरोपींकडून 11 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चौघांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास तपास शेवगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बडदे करीत आहे.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Ahmednagar Crime News a gambling den

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here