Home अहमदनगर धक्कादायक: गोदावरी नदीत आढळला मृतदेह

धक्कादायक: गोदावरी नदीत आढळला मृतदेह

Kopargaon Body found in Godavari river

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोपरगाव शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह (Body found in Godavari river)सायंकाळी आढळून आला आहे. कोकमठाण येथील व्यक्तीचा हा मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे.  गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली कोकमठाण येथील विशाल चंद्रकांत जपे (वय 40) यांचा मृतदेह असल्याची माहिती मूकबधीर शाळेच्या शिक्षकांनी अमोल चंद्रकांत जपे यांना दिली.

त्यांनी माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी ते मृत असल्याचे घोषित केले . यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Kopargaon Body found in Godavari river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here