Home अकोले अकोलेत अवैध दारू वाहतूक करणारे तिघे जण अटकेत

अकोलेत अवैध दारू वाहतूक करणारे तिघे जण अटकेत

Crime News Three arrested for smuggling liquor in Akole

राजूर | Akole Crime News | Rajur:   अवैध दारुची वाहतुक करणारे तीन आरोपी पकडण्यात राजूर पोलिसांना यश आले आहे. अवैध दारू माफियांच्या राजूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अवैध दारुची वाहतुक करणारे तीन आरोपी वाहनांसह राजुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

संताजी चौक राजुर येथे दोन इसम मोटार सायकलवर दारूचे बॉक्स घेवुन येणार असल्याची माहीती राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली.सदर वाहनावर कारवाई करण्याकरिता पथकास  संताजी चौक राजुर येथे रवाना केले असता तेथे दोन इसम काळया रंगाच्या मोटार सायकलवर निलेश अशोक घाटकर, रा. राजुर याला दारुचे बॉक्स देत असताना छापा टाकुन गाडीसह सदर दोन इसम व निलेश घाटकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दारुचा मुद्देमाल 11520/-रु.कि.च्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 192 सिलंबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली. 40,000/- रु. कि. हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची स्पेलडर प्लसं विना नंबरची जु.वा. कि.अ.एकुण-51,520 /- रु.कि. आरोपी निलेश अशोक घाटकर,ओम रामदास उघडे,वय-22 रा-म्हाळदेवी,ता-अकोले, सचिन सुदाम जाधव,वय-25 रा-संगमनेर यांच्या विरुद्ध राजुर पोस्टे गु.र.नं 217/2021 मु.पो.ऑक्ट कलम 65(अ),83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक तपास राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस हवालदार कैलास नेहे, पोलीस नाईक देवीदास भडकवाड, अशोक गाडे, विजय फटांगरे, राकेश मुळाने आदी करीत आहे.

Web Title: Crime News Three arrested for smuggling liquor in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here