Home अहमदनगर Crime News: महिलेवर महिलेनेच केला कुऱ्हाडीने वार

Crime News: महिलेवर महिलेनेच केला कुऱ्हाडीने वार

Crime News woman attacked the woman with an ax

राहुरी | Crime News: माझ्या घरासमोर भांडण करू नका असे म्हणाल्याचा राग येऊन राहुरी तालुक्यातील महिलेवर कुऱ्हाडीने वार करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान घडली. कुसुमबाई पवार या ६० वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून अर्चना अनिल गायकवाड रा. राहुरी, गयाबाई केरु माळी रा. आश्वी ता. संगमनेर, गयाबाई हिची मुलगी पुनम राहणार दत्तनगर राहुरी, गयाबाई हिची मुलगी सोनम रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी या चार महिलांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार रवींद्र डावखर करीत आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे कि, सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास आरडगाव येथे पवार यांच्या घरासमोर भांडण चालू होते. तेव्हा पवार या आरोपींना म्हणाल्या, तुम्ही लिलाबाईला कशाला मारहाण करता? तुम्ही माझ्या घरासमोर भांडण करू नका. असे म्हणाल्याचा राग येऊन यातील आरोपींनी कुसूमबाई पवार व लिलाबाई यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केली. तसेच आरोपीने कुसूमबाई पवार यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून जखमी केले असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Crime News woman attacked the woman with an ax

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here