Home क्राईम संगमनेर: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

संगमनेर: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

Sangamner minor girl was lured away

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुभम भाऊसाहेब शेळके हल्ली रा, पारेगाव बुद्रुक या तरूणाविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मुलीच्या वडिलांनी बुधवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे. नान्नज दुमाला येथून सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आरोपी शुभम भाऊसाहेब शेळके याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले आहे. शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात शुभम शेळके याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पारधी हे करीत आहे.

Web Title: Sangamner minor girl was lured away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here