वर्गणीचे पैसे परत दे असे म्हणत तरुणास बेदम मारहाण
जामखेड | Crime News: जामखेड तालुक्यातील नानज येथील एका युवकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आम्ही दिलेले वर्गणीचे पैसे परत कर असे म्हणत अमोल मधुकर दळवी या युवकास बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पप्पू केरबा दळवी व राहुल नारायण दळवी रा. नानज या दोघ्नावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील नान्नज परिसरातील गोपाळ \पुरा येथे संत देणा महाराज मंदिर स्थापनेचे काम सुरु आहे. याची जबाबदारी अमोल दळवी यांचेकडे आहे. वर्गणीचे पैसे आम्हाला दे असे म्हणत पप्पू व राहुलने अमोल यास बेदम मारहाण केली. याप्रकरणी अमोल याने जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने वरील दोघांवर गुन्हा crime filed दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime News young man was beaten to death