Home अहमदनगर Crime: सहाय्यक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की

Crime: सहाय्यक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की

Crime Pushing the assistant police inspector

शिर्डी | Shirdi Crime:  शिर्डी शहरातील कनकुरी रोडरील हॉटेल साईकृष्णा या हॉटेलसमोर एका गाडीची चौकशी करत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास एकाने गोंधळ घालून अरेरावी करत धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी शहरात वाढत्या धूमस्टाईल चोरीच्या घटना रोखण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनकडून विविध उपाययोजना व विनानंबर वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काल 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कनकुरी रोडवरील हॉटेल साईकृष्णा समोर एक पांढरा रंग असलेली विनानंबरची दुचाकी उभी असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश आसाराम दाभाडे व सरकारी वाहन चालक चौकशी करत असताना खंडु मारुती गोर्डे राहणार श्रीराम नगर शिर्डी याने गोंधळ घालून अरेरावी करत तुम्हाला कोणी अधिकार दिला?  मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही. माझी मोठी ओळख आहे. तुम्ही कोण लागून गेले, कागदपत्रे नाही असे सांगत धावुन आला सरकारी गणवेशावर असताना धक्काबुक्की केली. आरडाओरड करुन गोंधळ घातला. शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खंडु गोर्डे यांच्याविरुध्द भादंवि कलम 354,34अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

Web Title: Crime Pushing the assistant police inspector

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here