Home महाराष्ट्र धक्कादायक घटना: ४२ वर्षाच्या दाजीचा अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार

धक्कादायक घटना: ४२ वर्षाच्या दाजीचा अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार

Daji, 42, rape his younger sister-in-law 

पुणे | Pune Crime: बहिणीला नांदविणार नाही अशी धमकी देत दाजीने आपल्या अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यातून १५ वर्षाची मुलगी गर्भवती राहिली. याबाबत गाडीतळ येथे राहणाऱ्या पिडीत मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तिच्या ४२ वर्षाच्या दाजीला अटक करण्यात आली आहे.

गाडीतळ येथील साईनाथ वसाहतीत डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा पती आहे. डिसेंबर २०२० मध्ये घरात कोणी नसताना त्याने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार (Sexually Abuse) केला. सदर प्रकारची कोठे वाच्यता केल्यास तुझ्या बहिणीला नंदाविणार नाही अशी धमकी दिल्याने मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यानंतर वेळोवेळी या मुलीवर बलात्कार केला. या लैंगिक अत्याचारात गर्भवती राहिली. पाच महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला.  

Web Title: Daji, 42, rape his younger sister-in-law 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here