Home संगमनेर Crime: संगमनेरात डॉ. आंबेडकर जयंती शोभयात्रा मिरवणुकीला गालबोट, १२५ जणांवर गुन्हा

Crime: संगमनेरात डॉ. आंबेडकर जयंती शोभयात्रा मिरवणुकीला गालबोट, १२५ जणांवर गुन्हा

Sangamner Dr. Ambedkar Jayanti procession marched, 125 people Crime charged

Sangamner Crime | संगमनेर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुरुवारी संगमनेरात निघालेल्या शोभयात्रेला काही हुल्लडबाज तरुणांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमात सुरु असलेली महामानवाची शोभयात्रा मेनरोडवर येताच काही मुस्लीम तरुणांनी चांदतारा रेखाटलेले हिरवे व लाल झेंडे हाती घेऊन या शोभ यात्रेत शिरकाव केला. यावेळी या तरुणांनी अल्ला हु अकबर, इस्लाम झिंदाबाद अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी या टोळक्यातील तरुणांनी महामानवाची प्रतिमा ठेवलेल्या रथासमोर येऊन विक्षिप्त हावभाव व नृत्य करीत रथ ओढण्यास सुरुवात केली. तर काहींनी शोभयात्रेतील महिलांना स्पर्श करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या हुल्लडबाजी तरुणानी अनाधिकाराने प्रवेश करून दुसऱ्या धर्माच्या भावना दुखविल्या व प्रतिमेचा अवमान होईल असे कृत्य केले. सदरचा प्रकार लक्षात येताच पोलीस उप अधीक्षक राहुल मदने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोभ यात्रा मार्गस्थ केली. याप्रकरणी किशोर चव्हाण रा. दिल्ली नाका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात फिरोज गुलाब बागवान रा. मोमिनपुरा, अहमद  कामर चौधरी, अमन समीन बागबान, हुजेब इक्बाल बागबान सोहेल बागबान अशा आरोपींसह याप्रकरणी पोलिसांनी १२५ जणांवर कट रचून धार्मिक भावना भडकविणे, दंगल घडविण्याचा प्रयत्न करणे, मारहाण व धक्काबुक्की करणे, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल केला असून त्यातील मारुफ अस्लम बागवान रा. बागवानपुरा  व अब्दुल समेद जावेद कुरेशी रा. भारतनगर या दोघांना अटक केली आहे.

Web Title: Sangamner Dr. Ambedkar Jayanti procession marched, 125 people Crime charged

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here