Home महाराष्ट्र Accident: वीज पडून मेंढपाळ आणि दहा मेंढ्याचा मृत्यू

Accident: वीज पडून मेंढपाळ आणि दहा मेंढ्याचा मृत्यू

Accident Shepherd and ten sheep killed by lightning

सांगली | Sangali Accident:  जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे मेंढ्याच्या कळपावर विज पडून मेंढपाळ आणि दहा मेंढ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रांमचंद्र पांडुरंग गडदे असे मृत्यू झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. नांगोळे येथील कवठेमहांकाळ जत रस्त्यावर काल सायंकाळी मेंढ्याच्या कळपावर आचानक विज पडली. त्यात मेंढपाळ गडदे गंभीर भाजले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर दहा मेंढ्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात करण्यात आली आहे. रामचंद्र गडदे हे नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्या चारावयास घेऊन गेले होते. दिवसभर मेंढ्या चारुण सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरी येत होते. कवठेमहांकाळ जत रस्त्यावर पिंपळवाडी बस थांब्याच्या पुढे लोखंडी पुलाच्या जवळ नांगोळे गावच्या हद्दीत आले असता वादळी वारे व पाऊस जोरदार सुरू झाला. याच वेळी जोरदार विजांचा गडगडाट होऊन रामचंद्र गडदे यांच्या अंगावर व मेंढ्याच्या कळपावर विज कोसळून ते भाजले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गडदे यांचा भाचा सुनिल हुबाले यांनी कवठेमहांकाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र डाँक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. गडदे यांच्या दहा मेंढ्या मेल्याने त्यांचे सुमारे दोन लाखांवर नुकसान झाले आहे.

Web Title: Accident Shepherd and ten sheep killed by lightning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here