Home महाराष्ट्र मोठी बातमी; गुणरत्न सदावर्तेंना या तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मोठी बातमी; गुणरत्न सदावर्तेंना या तारखेपर्यंत पोलीस कोठडी

gunratna sadavarte three day police Custody

सातारा: मराठा आरक्षण प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपातून गुरुवारी वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांना अटक केली होती. याप्रकरणी आज (शुक्रवार) सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दाेन्ही बाजूने जाेरदार युक्तीवाद झाला. न्यायाधिश श्री. शेंडगे यांनी सदावर्तेंना १८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आज सकाळी सव्वा अकरा वाजता सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधिश श्री. शेंडगे यांच्या समोर  गुणरत्न सदावर्ते यांना हजर करण्यात आले होते.

खासदार उदयनराजे भोसले  आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत अपशब्द वापरुन सदावर्ते यांनी टीका केली होती.  मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. मराठा आरक्षणालाही त्यांचा विरोध होता. सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याने स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र निकम यांनी त्यांच्या विराेधात सन २०२० मध्ये सातारा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्या प्रकरणी त्यांना गुरुवारी सातारा पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतलं होते. न्यायालयात हजर केले हाेते. न्यायाधिश शेंडगे यांनी सदावर्ते यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

Web Title: gunratna sadavarte three day police Custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here