Home अहमदनगर अहमदनगर: बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्ये आढळला कनिष्ठ लिपिकाचा मृतदेह

अहमदनगर: बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्ये आढळला कनिष्ठ लिपिकाचा मृतदेह

Breaking News | Ahmednagar: बंद पडलेल्या कंपनीच्या एका रूममध्ये कनिष्ठ लिपिकाचा निर्घृण खून केल्याची घटना.

Dead body of a junior clerk was found in the closed company room

अहमदनगर: एमआयडीसी परिसरात खून झाल्याची घटना समोर आली आहे.  बंद पडलेल्या कंपनीच्या एका रूममध्ये कनिष्ठ लिपिकाचा निर्घृण खून (murder) केल्याची घटना घडली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की,  बंद पडलेल्या कंपनीच्या एका रूममध्ये कनिष्ठ लिपिकाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. संदीप कमलाकर शेळके उर्फ बाळू असं मृत व्यक्तीचे नाव आहे. संदीप कमलाकर शेळके उर्फ बाळू हे गजानन कॉलनी नवनागापूर येथे राहत होते. ही मयत व्यक्ती कोपरगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत होती. परंतु गेल्या तीन वर्षापासून वरिष्ठांच्या झालेल्या वादामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून ही व्यक्ती नगरमध्येच होती.

सह्याद्री कंपनीच्या बंद पडलेल्या प्लॉटमध्ये असलेले एका रूममध्ये त्यांचा मृतदेह (dead body) आढळून आला. गळा आवळून आणि संपूर्ण चेहरा दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली आहे. मयताची ओळख त्याच्या खिशात सापडलेल्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या घटनेचा पोलीस तपास करीत आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Dead body of a junior clerk was found in the closed company room

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here