Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण

अहमदनगर: अल्पवयीन मुलीचे अपहरण

Breaking News | Ahmednagar: 15  वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना.

Rahuri Abduction of a minor girl

राहुरी:  घरात एकटीच असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात तरुणाने फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. २१ फेब्रुवारी रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात घडली.

पिडीत अल्पवयीन मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. तसेच तिची बहिण व भाऊ शाळेत गेले होते. यावेळी पिडीत मुलगी घरी एकटीच होती. मुलीचे आई-वडील सायंकाळी घरी आले. तेव्हा त्यांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे दिसले. त्यांनी आजूबाजूला व परिसरात मुलीचा शोध घेतला. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तिच्या आई-वडीलांची खात्री झाली. मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात भा. दं वि. कलम ३६३ प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Rahuri Abduction of a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here