Home संगमनेर संगमनेर: मला वारसदार लावा जन्मदात्या बापाला मारहाण

संगमनेर: मला वारसदार लावा जन्मदात्या बापाला मारहाण

Breaking News | Sangamner Crime: जमिनीच्या उताऱ्यावर वारसदार लावावे, अशी मुलाने केलेली मागणी त्याच्या वडिलांनी फेटाळल्याने संतप्त झालेल्या मुलाने आपल्या सख्ख्या बापाला मारहाण केल्याची घटना.

Sangamner Crime Make me an heir Beat the birth father

संगमनेर: विकलेल्या पाईपलाईनचे सात लाख रुपये मिळाले व जमिनीच्या उताऱ्यावर वारसदार लावावे, अशी मुलाने केलेली मागणी त्याच्या वडिलांनी फेटाळल्याने संतप्त झालेल्या मुलाने आपल्या सख्ख्या बापाला मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मनोली येथे घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नामदेव शिंदे (वय ६५) हे आपल्या पत्नीसह राहत असून, त्यांच्या शेजारी मुलगा अण्णासाहेब नामदेव शिंदे, पत्नी निर्मला अण्णासाहेब शिंदे व दोन मुली राहतात. मुलगा अण्णासाहेब हा पैशांसाठी नेहमी आपल्या वडिलांना शिवीगाळ दमदाटी करायचा. दरम्यान, वडील घरी असताना त्याने पाण्याची पाईपलाईन विकली आहे त्याचे तुम्हाला ७ लाख रुपये मिळाले ते मला द्या, अशी मागणी केली. तसेच आपल्या घरासमोर ५० ट्रेलर मुरुम टाकून द्या, वरझडी येथे असलेल्या जमिनीच्या उताऱ्यावर मला वारसदार लावा, अशी मागणी केली. यासाठी वडिलांनी विरोध दर्शवल्याने संतापलेल्या अण्णासाहेब शिंदे याने वडिलांना मारहाण केली. तसेच निर्मला अण्णासाहेब शिंदे व मुलींनी शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की केली. याबाबत नामदेव शिंदे यांनी आश्वी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. ३७/२०२४ भादंवि कलम ३२५, ३२४, २२३, ५०४, ५०६, ३४ नुसार वरील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title: Sangamner Crime Make me an heir Beat the birth father

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here