Home अहमदनगर अहमदनगर: कट्ट्याचा धाक दाखवून दोन लाख रूपयांची लूट

अहमदनगर: कट्ट्याचा धाक दाखवून दोन लाख रूपयांची लूट

Breaking News | Ahmednagar:  गावठी कट्ट्याचा धाक दाखवून टेम्पो चालकासह किराणा मालाच्या मॅनेजरकडून दोन लाखांची रोकड चौघा जणांनी लुटले. (Robbed).

Robbed two lakh rupees by showing fear of Katta

नेवासा :  कुकाणा शिवारात गावठी कट्ट्याचा धाक दाखवून टेम्पो चालकासह किराणा मालाच्या मॅनेजरकडून दोन लाखांची रोकड चौघा जणांनी लुटले. ही घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुकाणा येथील नाना कारभारी निकम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कुकाणा येथील होलसेल किराणा व्यापारी रितेश बाफना यांच्या किराणा मालाची आसपासच्या गावांमध्ये विक्री करण्याचे काम आपण करतो. बुधवारी (दि.२१) टेम्पोमध्ये चालक सुधीर दळवी व मजूर गोरक्षनाथ नाबदे, अक्षय इंगळे यांच्यासह किराणा माल तरवडी, गेवराई, शिरसगाव, रामडोह, खामगाव व दहिगाव याठिकाणी वाटप केला. पुन्हा कुकाण्याकडे दहिगावमार्गे येत असताना, कुकाणा शिवारातील मळीच्या ओढ्यानजिक एक बंद पडलेला टॅक्टर उभा असल्याने टेम्पो हळू झाला. यावेळी रात्री ७.४५ च्या सुमारास अचानक दोन मोटारसायकलवरून २० ते २५ वयाचे चौघे तरूण आले. त्यांनी टेम्पोला गाड्या आडव्या लावल्या. गावठी कट्ट्याचा धाक दाखवून डोक्याला लावला. किराणा मालाचे जमा झालेले दोन लाखांची रोकड बँग हिसकावून घेवून ते पळून गेले. चौघांनी तोंडावर मास्क लावलेले होते. अंगात काळ्या रंगाचे जर्किंन घातलेले होते. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक मनोज अहिरे तपास करीत आहेत.

Web Title: Robbed two lakh rupees by showing fear of Katta

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here