संगमनेर: कारने दिली दुचाकीला पाठीमागून धडक अन…
Breaking News | Sangamner: दुचाकीला कारची पाठीमागून धडक बसली (Accident).
संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तालुक्यातील ढोलेवाडी शिवारात दुचाकीला कारची पाठीमागून धडक बसली, यात ६३ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लहानू सखाराम ढमाले (वय ६३. रा. घुलेवाडी फाटा, ता. संगमनेर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा पुतण्या सुखदेव दगडू ढमाले (वय ५१, रा. दत्त मंदिराशेजारी, घुलेवाडी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच. १४, सी. एस. ६६७१ या कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, ढमाले हे दुचाकीहून जात असताना त्यांच्या दुचाकीला (एम.एच.१७, ए.आर.६५६) कारची धडक बसली. अपघातात ढमाले यांच्या डोक्याला आणि हातापायाला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस हेड कॉस्टेबल कानिफ जाधव करीत आहेत.
Web Title: Accident car hit the bike from behind
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study