Home अहमदनगर अहमदनगर: पुलाच्या नळीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर: पुलाच्या नळीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Breaking News | Ahmednagar: पुलाच्या नळीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

The dead body of an unknown person was found in the tube of the bridge

जामखेड : येथील गितेवाडी फाट्याजवळ पुलाच्या नळीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकी हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकरी दादाहरी शिवाजी चौधार (रा. गितेवाडी) हे खर्डा शहरात रतिबाचे दूध घालण्यासाठी आले होते. परत आपल्या गावी चालले असता पुलाच्या नळीमध्ये ६० ते ६५ वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह त्यांना दिसून आला. त्यांनी खर्डा पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली.

या खबरीवरून खर्डा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दफन विधी खर्डा येथे खर्डा ग्रामपंचायत कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांनी केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे करीत आहेत.

Web Title: The dead body of an unknown person was found in the tube of the bridge

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here