Home अहमदनगर अहमदनगर:  मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

अहमदनगर:  मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Breaking News | Ahmednagar:  श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात मालट्रक व दुचाकीत झालेल्या भिषण अपघातात ३४ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

bike rider was killed on the spot in a collision with a goods truck

देवळाली प्रवरा: राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावरील श्रीरामपूर-ताहाराबाद चौकात मालट्रक व दुचाकीत झालेल्या भिषण अपघातात ३४ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तो तालुक्यातील चिंचविहिरे येथील रहिवासी होता.

राहुरी फॅक्टरी येथे रविवार ७ जानेवारी रोजी रात्री पावणे नऊच्या वाजण्याच्या सुमारास अहमदनगर वरून आलेला मालट्रक (एमएच १७ बीवाय ७९४३) नगर-मनमाड महामार्गावरील ताहाराबाद चौकातून श्रीरामपूर रस्त्याकडे वळत असताना चिंचविहिरे येथे घरी जाण्यासाठी दुचाकीवरुन (एमएच १७ सीएच ५६६८) ताहाराबाद रस्त्याकडे निघालेल्या योगेश सुभाष पानसंबळ (वय ३४) रा. चिंचविहिरे यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार योगेश पानसंबळ रस्त्यावर पडून ट्रकच्या चाकाखाली सापडला व त्याला ट्रकने श्रीरामपूर रोडकडे जवळपास ३० ते ४० फुटापर्यंत ओढत नेले. ट्रकचा चालक गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

उपस्थितांनी जखमीला रुग्णवाहिकेमधून राहुरी येथील खासगी रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय सूत्रांनी जखमीला मृत घोषित केले. मयत योगेश पानसंबळ यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. गिरणी व्यावसायिक सुभाष पानसंबळ यांचा मुलगा तर ऑडिटर संजय पानसंबळ व शरद पानसंबळ यांचे चुलत बंधू होत.

ताहाराबाद चौकात कायमच वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांनी अनेकदा मागणी करुनही या ठिकाणी अद्यापपर्यंत ट्राफीक सिग्नल व गतिरोधक बसविण्यात आलेले नाही. आणखी किती जणांचा बळी जाण्याची सबंधित अधिकारी वाट पाहत आहेत? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: bike rider was killed on the spot in a collision with a goods truck

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here