संगमनेर: दोन महिलांना मारहाण करून विनयभंग
Breaking News | Sangamner: जुन्या वादातून दोन महिलांना मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल.
संगमनेर:- जुन्या वादातून दोन महिलांना मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी दुपारी शहरातील मालदाडरोड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहरातील चैतन्यनगर परिसरातील महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत तिने म्हटले आहे की, आपण व आपली नातेवाईक अशा दोघी शनिवारी सकाळी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेलो होतो. या रुग्णालयातील डॉक्टर येण्यास उशीर असल्याने आपण तेथे न थांबता पुन्हा मागे आलो. मालदाड रस्त्यावरून आम्ही दोघी पायी जात असताना मालदाड रोड परिसरातील साईश्रद्धानगर जवळील काटवनाजवळ दशरथ बबन सातपुते व त्याचा मुलगा योगेश दशरथ सातपुते हे आमच्याजवळ आले. तूच माझ्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करते काय असे म्हणून योगेश याने आपली साडी ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने आपल्या गळ्यातील चेन ओढली. तुमच्याजवळ जास्त पैसे झाले का? असे सांगून आपल्या सोबत असलेल्या महिलेचाही त्याने विनयभंग केला. मालदाड रोड परिसरात दिसली तर तुझा खून करून टाकू अशी धमकी त्यांनी दिली असे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दशरथ बबन सातपुते व योगेश सातपुते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Two women were beaten and molested
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News