Home अहमदनगर म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून व्यक्ती कोट्यधीश होऊ शकतो-सुनील कडलग

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून व्यक्ती कोट्यधीश होऊ शकतो-सुनील कडलग

Mutual Investment: म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीही कोट्यधीश होऊ शकतो.

a person can become a millionaire through mutual fund investment

राजूर: म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीही कोट्यधीश होऊ शकतो. ही स्वप्न पाहिली पाहिजेत, असे प्रतिपादन म्युच्युअल फंड वितरक व कडलग इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कडलग यांनी केले. राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांना आर्थिक मंत्र देण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी ते  बोलत होते.

यावेळी प्राचार्य यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही करण्यात आला. कडलग म्हणाले, सद्यस्थितीत भारत जागतिक पातळीवरील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. २०२९ मध्ये भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२१-२२ मध्ये लोकांची बचत १९ टक्क्यांनी घटलेली असताना म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तब्बल १५० टक्क्यांनी वाढली आहे. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण होत आहे. गुंतवणुकीतून कसे फायदे होतात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 

आर्थिक मंदीतही भारत ठरताेय ‘ब्राईट स्पॉट’ बँकांमध्ये ठेवीचे दर घसरल्याने सामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे आकर्षित झाला आहे. एसआयपी खात्यांची संख्या ५.५५ कोटी तर गुंतवणूक १२ हजार २७६ कोटी रुपयांच्या उच्च पातळीवर पोहोचली आहे. आर्थिक मंदीतही भारत ‘ब्राईट स्पॉट’ ठरत असल्याचा निकष आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने काढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्राचार्य बनकर सर म्हणाले, पैशाशिवाय काही होत नाही त्यामुळे  पैशाचे योग्य नियोजन करा आणि एसआयपी मध्ये किमान बचत करून मोठे व्हा असे आवाहन सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना केले. 

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब  बनकर, उप प्राचार्य अण्णासाहेब धतुरे, रमेश शेंडगे, शरद तुपाविहीरे व सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: a person can become a millionaire through mutual fund investment

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here