धक्कादायक प्रकार: धावत्या वाहनातून नदीत फेकले मृत अर्भक
Beed Dead infants: लाल रंगाच्या पिशवीत गुंडाळून टाकलेले मृत अर्भक आढळले.
बीड : तालुक्यातील बक्करवाडी येथील अवैध गर्भपातादरम्यान मातेच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच पारगाव जप्ती शिवारातील सिंदफणा नदीच्या पुलावर धावत्या वाहनातून मृत अर्भक फेकल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.
सिंदफणा नदीवरील गेवराईला जाणाऱ्या मार्गावरील पुलावर रविवारी सकाळी साडेदहा वाजता लाल रंगाच्या पिशवीत गुंडाळून टाकलेले मृत अर्भक आढळले. पोलिसांनी पंचनामा करून मृत अर्भक ताब्यात घेतले व जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर उत्तरीय तपासणी केली. साडेचार महिने इतकी वाढ झालेले हे अर्भक असून, ते २४ तासांच्या आत मृत झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. मात्र, अंदाज आहे.
डॉक्टरांना त्याची लिंग निश्चिती करता आली नाही. शवविच्छेदन व व्हिसेरा अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. याप्रकरणी अज्ञात मातेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धावत्या वाहनातून लाल पिशवीत गुंडाळलेले अर्भक नदीत फेकायचे असावे. मात्र, कठड्याला लागून पुलावरच पडल्याचा अंदाज आहे.
Web Title: Dead infants thrown into a river by speeding vehicle