Home बीड Murder: पाणी मागितले आणि खून करून निघून गेले

Murder: पाणी मागितले आणि खून करून निघून गेले

Beed Murder Case: रक्ताच्या थारोळ्यात सोडून घरातील बल्ब काढून घेत मारेकरी पळून गेले.

Asked for water and left with the murder

केज | बीड : पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी दाम्पत्यावर चाकूने वार केले. यात आहे. पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. पत्नीच्या अंगावरील दागिने हिसकावून मारेकरी पळून गेले. ही खळबळजनक घटना चिंचोली माळी येथे सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजेदरम्यान घडली.

पांडुरंग राऊत (६०) असे मयताचे नाव असून त्यांच्या पत्नी शशिकला (५५) या जखमी आहेत. चिंचोली माळी येथे केज रस्त्यावर त्यांचे घर आहे.

सोमवारी सायंकाळी तोंडाला गेले. स्कार्फ बांधलेल्या अनोळखी तिघांनी केज दारासमोर येऊन पिण्यासाठी पाणी मागितले. शशिकला पाणी देण्यास गेल्या तेव्हा गळ्यातील दागिने हिसकावून त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. यावेळी पांडुरंग यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावरही वार केले. दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात सोडून घरातील बल्ब काढून घेत मारेकरी पळून गेले.

ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी नाकाबंदी केली. मारेकरी चोरटे होते की अन्य कोणी, याचा उशिरापर्यंत उलगडा झाला नव्हता.

Web Title: Asked for water and left with the murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here