Home अहमदनगर अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक अत्याचार

Ahmednagar | Rahuri Taluka Sexually abusing of minor girl: टाकळी ढोकेश्वर येथे नेऊन पडक्या खोलीत अत्याचार करण्यात आला.

Kidnapping a minor girl and Sexually abusing her

राहुरी: राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातून राहत्या घरातून पारनेर येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद शारीरिक अत्याचार केल्याची घटना २७ जून रोजी घडली. याप्रकरणी ८ जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दि. 27 जून रोजी संध्याकाळी जेवण करून तिच्या आई सोबत घराच्या समोर असलेल्या पटांगणामध्ये झोपली होती. मध्यरात्री एक वाजे दरम्यान आरोपी टिक्कल बर्डे हा त्या अल्पवयीन मुली जवळ गेला. त्याने तिला झोपेतून उठवून तिचे तोंड दाबून उचलून थोडे लांब नेले. तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तू जर आरडाओरडा केला तर बघ, अशी दमदाटी केली. त्यानंतर तिला गाडीवर बसवून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर शिवारात नेले. तिथे एका पडक्या खोलीमध्ये तिच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. जर आता घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन. अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला.

ती अल्पवयीन मुलगी कशीबशी आपल्या घरी पोहचली. त्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत  फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी टिक्कल रोहिदास बर्डे, रा. बारागाव नांदूर याच्यावर अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहेत.

Web Title: Kidnapping a minor girl and Sexually abusing her

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here