अहमदनगर ब्रेकिंग: बस कारचा भीषण अपघात, एक जण ठार- Accident
Ahmednagar Accident: समोरासमोर भीषण अपघात, एक ठार, नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद.
अहमदनगर: अहमदनगर- पाथर्डी महामार्गावरील कौडगाव येथे खासगी बस व कारचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनिल दशरथ पालवे वय ३८ रा. बाळेवाडी ता. नगर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अहमदनगर- पाथर्डी महामार्गावरील कौडगाव (ता. नगर) शिवारात सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना स्थानिकांनी उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या अपघातात अनिल पालवे यांचा मृत्यू झाला. जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: One killed in a bus car accident