Home संगमनेर संगमनेर तालुक्यात विद्यार्थी जीव धोक्यात घालून बंधाऱ्यावरून पाण्यातून वाटचाल

संगमनेर तालुक्यात विद्यार्थी जीव धोक्यात घालून बंधाऱ्यावरून पाण्यातून वाटचाल

Sangamner: मुलांना अक्षरशः जीव मुठीत धरून शाळेत जावे लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

Sangamner Students walk through the water from the embankment 

संगमनेर: नगर जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कौठे बु. या गावात असणाऱ्या शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून बंधाऱ्यावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी या परिस्थितीवर मार्ग काढण्याची मागणी पालकांसह शाळेच्या वतीने करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठे बु. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. दरम्यान, मुळा नदीच्या पलीकडे असलेल्या कौठे खुर्द या गावातील विद्यार्थ्यांना या शाळेत यावे लागते. सध्या मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. कौठे खु. आणि कौठे बु. या गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी वापरावा लागतो. त्याची उंची कमी असल्याने सध्या या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या शाळकरी मुलांना अक्षरशः जीव मुठीत धरून शाळेत जावे लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पावसाळ्यामध्ये दरवर्षी हा प्रश्न उद्भवतो. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यानंतर या बंधाऱ्याची पातळी वाढत जाते. त्यामुळे रस्ता पूर्ण बंद होतो. मुलांना शाळेत मुक्कामी ठेवून घेता येत नाही. त्यामुळे शासनाने या बंधाऱ्याची उंची वाढवावी, अशी मागणी अमृतेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी दत्तात्रय सोंडेकर यांनी केली आहे.

Web Title: Sangamner Students walk through the water from the embankment 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here