Home अकोले पावसाची जोरदार बॅटींग: भंडारदरा ५० टक्के भरला

पावसाची जोरदार बॅटींग: भंडारदरा ५० टक्के भरला

Bhandardara Dam: भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 5295 दलघफू(47.96 टक्के) झाला, रात्री उशिरा निम्म्याच्या पुढे सरकला आहे. 

Bhandardara Dam 50 percent full

भंडारदरा: पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याने भंडारदरा निम्मे भरले आहे. अतिवृष्टीने काही ठिकाणी बांध फुटले. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

निळवंडे धरणातील (Nilwande Dam) पाणीसाठा रविवारी मध्यरात्री निम्म्यावर पोहचला होता. 8330 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सोमवारी दिवसभरात 164 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. सायंकाळी 4390 दलघफू (52.76टक्के) झाला होता. दिवसभरात 278 दलघफू नवीन पाणी दाखल झाल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सायंकाळी 5295 दलघफू(47.96 टक्के) झाला आहे. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा निम्म्याच्या पुढे सरकला होता. वाकी तलावाचा विसर्ग 1022 क्युसेक असून हे पाणी निळवंडेत जमा होत आहे.

प्रवरा, मुळा, आढळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढू लागला आहे. भंडारदरात रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर काल सोमवारी वाढला होता. पडणार्‍या पावसाची नोंद 87 मिमी झाली आहे. त्यामुळे कृष्णवंती नदी आणि ओढे नाले भरभरून वाहत आहेत.  अनेक ठिकाणी नुकसान झाले असून जनजीवन पुरते गारठून गेले आहे. जनावरेही गारठून जात आहेत.

Web Title: Bhandardara Dam 50 percent full

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here