Home अहमदनगर सोशियल मेडीयावर फेक अकाऊंट बनवून महाविद्यालयीन तरुणीची बदनामी

सोशियल मेडीयावर फेक अकाऊंट बनवून महाविद्यालयीन तरुणीची बदनामी

Defaming a college girl by creating a fake account on social media

Shrigonda | श्रीगोंदे: श्रीगोंदे शहरात मागील काही दिवसांपासून केवळ मुलींच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून बदनामीकारक मजकूर इतरांना पाठवले जात होते. तर दुसऱ्या घटनेत काही मुलींचे मोबाईल नंबर हॅक करून त्यांच्या मोबाईल मधील इतर नंबर अॅड करून व्हॉटसअॅप ग्रूप बनवण्याचे कारस्थान काही हॅकर करत असल्याचे उघड झाले. याबाबत वेगवेगळे दोन गुन्हे श्रीगोंदे पोलस स्टेशनला दाखल झाले असले तरी इतर काही जणांच्या बाबतीत असे मोबाईल हॅक करण्याच्या घटना घडल्या. मात्र तक्रार करण्यास अनेक जण पुढे आले नाही.

सध्या सर्वांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले. त्यात कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण असल्याने लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मोबाईल गरजेचा झाला असताना मोबाईलमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अॅप आणि मॅसेजची लिंक ओपन केल्यावर मोबाईलमधील डाटा हॅक करण्याचे प्रकार श्रीगोंद्यामध्ये घडले आहेत. विशेष म्हणजे शहरातील काही महाविद्यालयींन मुलींचे नंबर हॅक करण्यात आले होते. यातील काही पालकांच्या लक्षात आल्यावर याबाबत श्रीगोंदे पोलिसांना माहिती दिली, तर यानंतर नगरला सायबर शाखेत याबाबत तक्रार करण्यात आल्या. या मोबाईल हॅक करण्याच्या प्रकारामुळे काही विद्यार्थ्यांना आणि पालकांना नाहक मनस्ताप झाला.

Web Title: Defaming a college girl by creating a fake account on social media

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here