Home संगमनेर संगमनेर: पंचायत समिती बैठकीत उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यात खडाजंगी

संगमनेर: पंचायत समिती बैठकीत उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यात खडाजंगी

संगमनेर: पंचायत समिती बैठकीत उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यात खडाजंगी

संगमनेर: संगमनेर पंचायत समितीच्य मासिक बैठकीत विरोधी पक्षनेते अशोक सातपुते यांनी साकुर गणातील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मांडल्याने त्याला उपसभापती नवनाथ अरगडे यांनी विरोध केला. तालुक्याचे प्रश्न मांडल्यामुळे या दोन्ही सदस्यांमध्ये बाचाबाची होऊन दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली आहे. अन्य सदस्यांनी हस्तक्षेप केल्याने पुढील घटना टळली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

गुरुवार दिनांक १५ रोजी पंचायत समितीची मासिक बैठक सभापती निशाताई कोकणे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते अशोक सातपुते यांनी साकुर येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर रुग्णालयात उपस्थित राहत नाहीत त्यामुळे रुग्णाचे हाल होतात याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी उपसभापती नवनाथ अरगडे यांनी सातपुते यांना तुम्ही फक्त तुमच्या गणातील व गावातील प्रश्न मांडा तालुक्याचे प्रश्न मांडायचा तुम्हाला अधिकार नाहीत असे म्हणत सातपुते यांना विरोध केला. तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर बोलण्याचा सदस्यांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना विरोध करू शकत नाही असे अशोक सातपुते यांनी सागितले. अरगडे व सातपुते यांच्यात काही काळ बाचाबाची व अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी सभागृहातील फर्निचरची आदळ आपट करून माईक फेकण्यात आला. इतर सदस्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. सुमारे अर्धा तास या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले. विरोधी सदस्या सुनिता कानवडे यांनीही उपसभापतीच्या या कृतीला विरोध करत सभागृहाचे सचिव सुरेश शिंदे यांना सभागृहाचे नियम व जी.आर. वाचण्याची विनंती केली. या नियमात व जी.आर. मध्ये सदस्यांना तालुक्यातील इतर भागातील प्रश्न मांडू नये असा कोणताही नियम व अट नसल्याचे सभागृहाचे निदर्शनास आले.

या घटनेनंतर सभापतीच्या आदेशाने तालुक्यातील दुष्काळी भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न व उपाय यावर चर्चा करण्यात आली. या कामाजात अनेक सदस्यांनी सहभाग घेतला. अरगडे सातपुते वाद वगळता हि बैठक शांततेत पार पडली.   

Website Title: Deputy Chairman and Leader of the Opposition in the Panchayat Samiti meeting


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here