Home संगमनेर संगमनेर: ६० हजार रु. अज्ञात चोरट्यांनी लांबविले.

संगमनेर: ६० हजार रु. अज्ञात चोरट्यांनी लांबविले.

संगमनेर: ६० हजार रु. अज्ञात चोरट्यांनी लांबविले.

संगमनेर: रविवारी आपल्या मुला मुलींच्या साखरपुड्यासाठी आणून ठेवलेल्या ६० हजार रुपयांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारण्याची खळबळजनक घटना तालुक्यौतील निळवंडे येथे शुक्रवारी पहाटे घडली. या चोरीनंतर अज्ञात चोरट्यांनी शेजारीच राहणाऱ्या आणखी एका शेतकर्यांच्या घरातून किमती दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवराम दशरथ पवार रा. निळवंडे यांच्या मुलाचा व मुलीचा रविवारी साखरपुडा आहे. यासाठी पवार परिवाराने सर्व तयारी पूर्ण केली होती. दरम्यान गुरुवारी रात्री देवराम पवार हे कुटुंबासमवेत आपल्या जुन्या घरात झोपले होते. तर त्यांनी आपल्या अंगावरील कपडे नव्या घरात काढून ठेवले होते. यात त्यांच्या पॅटच्या खिशात ६० हजार रुपये होते. अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे या नव्या उघड्या घरात प्रवेश करून पवार यांच्या खिशातून ६० हजार रुपये चोरून नेले. सकाळी उठल्यावर चोरी झाल्याचे पवार यांच्या लक्षात आले. दरम्यान याच रात्री अज्ञात चोरट्यांनी पवार यांच्या जवळच राहणाऱ्या सचिन जगन्नाथ आव्हाड यांच्या घरात खिडकीतून प्रवेश करत सामानाची उचकापाचक करून किमती दागिने व रोख रक्कम लंपास केली.

या घटनेची फिर्याद देवराम पवार यांनी तालुका पोलिसांत दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याचा बरोबर नगर येथील श्र्वन पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र चोरट्यांचा माघमुस लागला नाही.

Website Title: sangamner taluka news Extinguished by unknown thieves


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here