Home अकोले अकोले: कळसमध्ये कृषी सेवा केंद्र जळून खाक

अकोले: कळसमध्ये कृषी सेवा केंद्र जळून खाक

अकोले: कळसमध्ये कृषी सेवा केंद्र जळून खाक

कळस: अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील लक्ष्मी उद्योग समुहाचे कृषी सेवा केंद्र गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास विजेच्या शोर्टसर्किटमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये केंद्र चालकाचे लाखोंचे नुकसान झाले.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

कळस येथील लक्ष्मण वाकचौरे यांच्या मालकीचे हे दुकान आहे. रात्री दहाच्या सुमारास अचानक विजेच्या शोर्ट सर्किटमुळे आग लागली. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. बंद दुकानातून धुराचे लोळे बाहेर पडू लागल्याने समोरच असलेल्या विनायक हॉटेलच्या मालकास लक्षात आले. त्यांनी कृषी सेवा केंद्राच्या मालकास आगीची माहिती दिली. दुकानाचे दरवाजा उघडताच धुराचे लोट बाहेर आले. गावातील काही तरुणांच्या पुढाकाराने आगीला आटोक्यात आणण्यात आले. तत्पूर्वी आगीत दुकानातील ८० ते ९० टक्के माल खाक झालाय. आग लागली त्यावेळी दुकानात अंदाजे ३० लाखांचा माल उपलब्ध होता. त्यातील मोठ्या प्रमाणावर मालाचा कोळसा झाला. यावेळी जालिंदर वाकचौरे, गोरख वाकचौरे, नामदेव निसाळ, राहुल बालोडे, स्वप्नील बालोडे, सुरज रणशूर, पुरुषोत्तम सरमाडे, बाळासाहेब वाकचौरे, संचित वाकचौरे, आकाश गोसावी आदींनी आग विझाविण्यासाठी प्रयत्न केले.  

Website Title: akole taluka news krushi seva kendra burns


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here