Home Crime News संगमनेरात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडेची ३० लाखांची फसवणूक

संगमनेरात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडेची ३० लाखांची फसवणूक

Sangamner Crime News: करुणा  मुंडे यांची ३० लाखांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना.

Dhananjaya Munde's wife Karuna Munde's fraud of 30 lakhs in Sangamner

संगमनेर: राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा  मुंडे यांची ३० लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तिघा भामट्यांनी गंडा घातला आहे.

लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड नावाच्या कंपनीत पैसे गुंतवल्यानंतर दरमहा ४५ हजार ते ७० हजार रुपये मिळवा, असे अमिष दाखवून संगमनेरच्या तिघा जणांनी करुणा धनंजय मुंडे यांना ३० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी श्रीमती मुंडे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती कोंची, पोस्ट निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (दोघे ही राहणार घुलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांनी करुणा धनंजय मुंडे यांचा विश्‍वास संपादन करीत त्यांना लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी बाबत माहिती दिली.

आमच्या या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होईल, तुम्ही जर मला ३० लाख रुपये दिले तर मी तुम्हाला कमीत कमी ४५ हजार ते ७० हजार रुपये महिन्याला नफा देईल तसेच यापेक्षा जास्त फायदा झाला तर तर त्याप्रमाणात तुम्हाला नफा देत जावू या पद्धतीने वरील तिघांनी करुणा मुंडे यांना पटवून दिले. त्याप्रमाणे श्रीमती मुंडे यांनी वरील तिघांना १० दिवसात कॅश व चेक स्वरुपात असे एकूण ३० लाख रुपये दिले.

मात्र त्यानंतरही वरील तिघांनी कंपनीबाबत काही एक महिती दिली नाही. तसेच कुठलाही नफा दिला नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये एकदाच वरील तिघांनी मुंडे यांना ४५ हजार रुपये दिले. त्यानंतर मुंडे यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. व खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. व पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे करुणा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारत संभाजी भोसले (रा. डाबे वस्ती कोंची पोस्ट निमगावजाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (दोघे ही राहणार घुलेवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.

Web Title: Dhananjaya Munde’s wife Karuna Munde’s fraud of 30 lakhs in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here